मिळाली ती सुट्टी घ्यायची !!!
रोज सारखा तयार होवून आदित्यला शाळेत सोडायला गेलो. तिथे गेल्यावर कळाले आज शाळा बंद आहे !! त्यानंतर त्याचा आणि माझा संवाद
आदित्य - बाबा आज सुट्टी का बर ?
मी : अरे भारताचे माजी राष्ट्रपतींचे काल निधन झाले
आदित्य : ओह ...खूप वाईट ..पण त्यामुळे शाळा का बंद ? कलाम आजोबांना शाळा नाही आवडायची का ?
मी : अरे नाही नाही... त्यांचे पूर्ण जीवन शिकण्यात आणि शिकवण्यात गेले...ते तर म्हणायचे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकणार आणि शिकवणार. त्यांनी शाळेत जाण्यासाठी खूप कष्ट घेतले.
आदित्य : मग आम्हाला आज सुट्टी का बर् ?
मी : अरे सुट्टी म्हणजे आपण आज त्यांची आठवान करायची. त्यांचे चरित्र वाचायचे
आदित्य : मग शाळेत सुट्टी देण्यापेक्षा आमचे टीचर का नाही सांगत त्याची कथा आज ?
मी (मनात ) : अरे असा नसत ....... तू आजून लहान आहेस.... मोठा झाला की तुला कळेल....... मिळाली ती सुट्टी घ्यायची... उगाच प्रश्न विचारायचे नाही...अशाने तुला लोक वेडा म्हणतील ...
जयहिंद !!!!
Comments
Post a Comment